“…तर मोदींनाही घरचा रस्ता दाखवू !”

“…तर मोदींनाही घरचा रस्ता दाखवू !”

पुणे – देशभरातील सर्व विरोधक मतभेद विसरुन एकत्र आले तर मोदींनाही घरचा रस्ता दाखवू. त्यासाठी पुढील निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र लढा देण्याची गरज आहे. असे झाले तर मोदींनाही घरचा रस्ता दाखवायला वेळ लागणार नाही, असं  वक्तव्य  गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पुण्यातील एका सभेत केलं आहे. लोकशाही आणि राज्यघटना बदलण्याची भाषा करणा-या भाजपला गुजरातमध्ये हिस्का दाखवला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतही भाजपला मोठा धक्का मिळणार असल्याचा विश्वासही जिग्नेश मेवाणी यांनी केला आहे.

दरम्यान रविवारी कोरेगाव शौर्य दिन अभियानातर्फे आयोजित केलेल्या  एल्गार परिषदेत बोलत असताना आमदार जिग्नेश यांनी यावेळी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. देशभरातील जनता अन्न, निवारा आणि कपडे या मुलभूत गरजांसाठी झगडत आहे. आणि भाजप सरकार घरवापसी, लव्ह जिहाद आणि गोमातेची भाषा बोलत आहे. त्यामुळे सर्व मतभेद विसरुन देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून भाजप सरकारला घरचा रस्ता दाखवण्याचं आवाहनही जिग्नेश यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना केलं आहे. तसेच आपल्या मनात काय आहे ते वेळ आल्यावर सांगू असे संकेतही जिग्नेश यांनी त्यावेळी दिले. पुढील निवडणुकीत ही जनता भाजपला घरचा रस्ता दाखविल असा विश्वासही आमदार जिग्नेश यांनी व्यक्त केला आहे.

 

COMMENTS