सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश, लोकसभेची उमेदवारी पक्की ?

सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश, लोकसभेची उमेदवारी पक्की ?

मुंबई – विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी नगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. ‘भाजपाचा विजय असो’ अशी घोषणा सुजय यांनी यावेळी दिली. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुजय यांच्या नावाची नगर लोकसभा मतदारसंघासाठी शिफारस करणार असून त्याला केंद्रीय निवडणूक समितीकडून हिरवा कंदील मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, माजी मंत्री बबनराव पाचपुते आदी उपस्थिती होते.

दरम्यान नगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादीनं नकार दिल्यानंतर सुजय यांनीभाजपमध्ये जाण्याचा  हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे सुजय यांच्या भाजपा प्रवेशाला विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी विरोध केला होता. दिलीप गांधी आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सुजय यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील हे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील असेही बोलले जात आहे.

COMMENTS