सुजय विखे भाजपमध्ये जाणार, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क ?

सुजय विखे भाजपमध्ये जाणार, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क ?

मुंबई – काँग्रेस-राष्ट्रवादीतील नगर दक्षिण लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे याठिकाणी निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. सुजय विखे यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली असल्याची माहिती आहे.

दरम्यान यावरुन शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी विखे पाटलांवर टीका केली आहे. ईडीची पीडा टळावी म्हणूनच मुलगा सुजयला भाजपामध्ये पाठवले का? असा उपहासात्मक प्रश्न मनिषा कायंदे यांनी विचारला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते कमी आणि शासनाचे दूत म्हणूनच जास्त कार्यरत होते, हे आपण गेली काही वर्षे अनुभवले आहे. भाजपा शासनाची विरोधी पक्ष नेत्यांनी मदत करण्यामागेही त्यांचा एक पाय भाजपात आणि एक पाय काँग्रेसमध्ये आहे. आपल्यावर ईडीची कारवाई तर होणार नाही ना? अशी भीती त्यांना वाटते आहे असेही मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

परंतु वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेतील तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यासाठी, सुजय विखे पाटील यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे.

COMMENTS