जीएसटीमुळे राज्यातील करदात्यांमध्ये वाढ – अर्थमंत्री

जीएसटीमुळे राज्यातील करदात्यांमध्ये वाढ – अर्थमंत्री

मुंबई – राज्याचे सन 2017-2018 चे बजेट आज विधिमंडळात सादर होत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत बजेट मांडत आहेत. देशात GST लागू झाल्यानंतरचं हे राज्याचं पहिलंच बजेट असून त्यामुळे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. तसेच जीएसटीचा फायदा झाला असून करदात्यांमध्ये मोठी वाढ झाली असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे. राज्यात 5 लाख 31 हजार नवीन करदात्यांची नोंद झाली असल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान महाराष्ट्राचा २०१७-१८ या वर्षीचा अर्थसंकल्प आज, शुक्रवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला. अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी ३०० कोटी आणि इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

 

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत आरोग्य सेवा, घरकुल, शासकीय वसतीगृहे, निवासी शाळा ह्यासाठी Rs 9949.22 Cr तरतूद.

राजर्षी शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेअंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग ह्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांचे प्रश्न जाणून अभ्यासपूर्ण उपाय योजना सुचविण्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेनवन, औरंगाबाद येथील वसतीगृह व सभागृह विस्तारीकरण व दुरुस्तीसाठी 2 कोटीचे अनुदान.

सागरी क्षेत्रातील विकास कामांचे नियमन व तटीय क्षेत्रांतील लोकांची पारंपारिक उपजीविका वाढविणे व क्षेत्र व्यवस्थापन ह्या प्रकल्पासाठी 9 कोटी 40 लक्ष रू. निधीची तरतूद.

GST मुळे राज्यातील करदात्यांच्या संख्येत वाढ – अर्थमंत्री

स्वच्छ भारत अभियानाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 1 हजार 526 कोटींची तरतूद – अर्थमंत्री

माता व बाल मृत्युचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राबविण्यात येणा-या प्रधान मंत्री मातृवंदना योजनेसाठी 65 कोटींची तरतूद – अर्थमंत्री

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियानासाठी 576 कोटी 5 लाखांची तरतूद – अर्थमंत्री

संकटग्रस्त महिलांसाठी स्वाधार गृहे ही योजना राबविण्यासाठी 20 कोटी रू. निधीची तरतूद.

सातवा आयोग लागू करण्यासाठी पुरेशी तरतूद – अर्थमंत्री

शासनाच्या योजनांची माहिती मिळावी यासाठी लोकसंवाद उपक्रमाची सुरुवात करणार – अर्थमंत्री

पर्यटनाला चालना देण्यासाठी वेंगुर्ल्यात पहिली भारतीय पर्यटन पाणबुडी उपलब्ध होणार

शेतकऱ्यांसाठी मिसकॉलवर शेतीविषयी माहिती उपलब्ध करण्यासाठी महासमाधान उपक्रम राबविणार – अर्थमंत्री

गणपतीपुळेच्या विकासासठी ७९ कोटी रुपयांचा विकास आराखडा

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 964 कोटी रू. निधीची तरतूद.

सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान- 900 कोटी रुपये तरतूद-वित्तमंत्री

मुंबई शहर आणि कोकण पट्टीवरील विविध स्थळांदरम्यान प्रवासी जलवाहतूक प्रस्तावित. महाराष्ट्र सागरी महामंडळ, मुंबई बंदर न्यास, आणि सिडको यांच्या सहकार्याने भाऊचा धक्का ते मांडवा, अलिबाग दरम्यान प्रवासी जलवाहतूक सेवेचा एप्रिल, 2018 मध्ये आरंभ-

राज्यातील गड किल्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे – अर्थमंत्री

सातारा येथील वस्तू संग्रहालयासाठी 5 कोटी – अर्थमंत्री

ग्रामीण भागात सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्प ही नवीन योजना राबविणार. ह्यासाठी 335 कोटी रू. निधीची तरतूद.

स्वच्छ भारत अभियानाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रू. 1 हजार 526 कोटी निधीची तरतूद.

रत्नागिरीमध्ये सापडलेल्या काळशिल्पाचे संरक्षण करण्यासाठी 24 कोटींची तरतूद – अर्थमंत्री

 

 

COMMENTS