तूर उत्पादक शेतक-यांसाठी सहकारमंत्र्यांचं आवाहन !

तूर उत्पादक शेतक-यांसाठी सहकारमंत्र्यांचं आवाहन !

मुंबई –  शेतक-यांकडुन तूर खरेदी केल्याशिवाय राज्यातील खरेदी केंद्र बंद करणार नाही. लवकरच तूर खरेदीला मुदतवाढ मिळणे अपेक्षीत असुन शेतक-यांनी तुर खरेदीबाबत आश्वस्त राहावे असे आवाहन  सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे. तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी आज सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी  केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या समवेत बैठक घेतली.यावेळी राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते. केंद्रीय कृषीमंत्री महोदयांशी या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असुन तुर खरेदीला मुदतवाढ देण्यास केंद्र शासन अनुकुल आहे. या बैठकीला केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत  यासह केंद्रीय सचिव पटनायक,नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक चढढा उपस्थित होते.

राज्यात यावर्षी 1 फेब्रुवारीपासून हमीभावाने तूर खरेदीला सुरुवात झाली. खरेदीचा विहीत कालावधी संपल्यानंतर 15 मेपर्यंत केंद्र शासनाने मुदतवाढ दिली होती. मात्र आणखी मुदतवाढ यावर्षी तुरखरेदीचे उददीष्ट ४४ लाख क्विंटल असुन त्यापैकी   १५ मे पर्यत 193 खरेदी केंद्रावर 33 लाख 15 हजार 132  किवंटल तुर खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांची तुर खरेदी होण्यासाठी प्रयत्न सुरू असून केंद्र शासनाने मुदतवाढ देण्यास अनुकुलता दर्शवली आहे. लवकरच मुदतवाढीचे आदेश निघण्याची शक्यता असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS