राज्य सरकार भांबवलेले – प्रवीण दरेकर

राज्य सरकार भांबवलेले – प्रवीण दरेकर

मुंबई – कोरोनाच्या संकट मोठे आहे. त्याचबरोबर आर्थिक संकटही आहे. सरकारला लाॅकडाऊन करावं का, कर्फ्यू करावा की नको याबाबत कोणतेही नियम नाहीत, त्यामुळे हे राज्य सरकार भांबवलेले आहे, अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू सापडल्याने केंद्र सरकारने ब्रिटनमधील विमानसेवा रद्द केली. तसेच राज्य सरकारने मंगळवार रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. सरकारच्या या निर्णयचा प्रवीण दरेकर यांनी चांगलाच समाचार घेतला.

दरेकर म्हणाले, मोठ्या कालावधीनंतर हाॅटेल, दुकाने आणि मंदिरे नुकतीच सुरू करण्यात आली. जेव्हा धोका वाटतो तेव्हा लाॅकडाऊन करा. आधीत संकटात सापडलेल्या सामान्य लोकांना पिचवू नका. नियम अटीमध्ये व्यावसायिकांना अडकवू नका, असे आवाहन आहे.

 

 

COMMENTS