पहिली दुसरीच्या मुलांना आता घरी अभ्यासाचे नो टेन्शन, होमवर्क नसणार !

पहिली दुसरीच्या मुलांना आता घरी अभ्यासाचे नो टेन्शन, होमवर्क नसणार !

मुंबई – राज्यातील शाळा, विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून सर्व राज्यातील शिक्षण विभागासाठी महत्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास न देण्याचे निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहेत. तसेच दप्तराच्या वजनाबाबतही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

पहिली आणि दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हे दीड किलोपेक्षा अधिक असायला नको असा निर्देश सरकारनं दिला आहे. तसेच तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हे २ ते ३ किलो असावे असंही सरकारचं म्हणणं आहे. सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे ४ किलो, आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे साडेचार किलो तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन ५ किलो असायला हवे असंही शासनानं या परिपत्रकात म्हटलं आहे.

COMMENTS