तंबाखूमुक्त शाळा, महाविद्यालयांसाठी राज्यात विशेष मोहीम, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटलांची माहिती !

तंबाखूमुक्त शाळा, महाविद्यालयांसाठी राज्यात विशेष मोहीम, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटलांची माहिती !

मुंबई – राज्यातील सर्व शाळा,महाविद्यालये तंबाखूजन्य पदार्थ, गुटखामुक्त करण्यासाठी पोलीस, अन्न व औषध प्रशासन आदी सर्व शासकीय यंत्रणांनी विशेष मोहीम राबवावी, तसेच या मोहिमेत स्वयंसेवी संस्थांबरोबरच नागरिकांचा सहभाग घ्यावा, असे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले आहेत. दरम्यान सिगारेट्स आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम, 2003 (कोट्पा) बाबत आढावा बैठक डॉ. पाटील यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान धुम्रपान तसेच गुटखा, तंबाखूचे सेवन करणाऱ्यांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असल्याचे सांगून डॉ. पाटील म्हणाले, शालेय जीवनापासूनच व्यसनांच्या दुष्परिणामाबाबत प्रबोधन झाल्यास विद्यार्थ्यांमधील व्यसनांचे प्रमाण रोखणे शक्य होईल.शाळा, महाविद्यालयांच्या 100 यार्डच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस कोट्पा अधिनियमानुसार बंदी आहे. या अधिनियमाची  प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व शाळा,महाविद्यालयांचा परिसर तंबाखूजन्य पदार्थ, गुटखामुक्त करण्यासाठी येत्या जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने 6 फेब्रुवारीपासून राज्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यस्तरापासून ते जिल्हास्तरावर पोलीस, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा समन्वय करण्यात येणार असून स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग घेण्यात येणार आहे.

 

COMMENTS