आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय !

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय खालीलप्रमाणे …

  1. मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबास वृक्षलागवडीसाठी सहकार्य करणाऱ्या कन्या वन समृद्धी योजनेला मान्यता.
  1. अक्कलकोट नगरपरिषदेस यात्राकर लागू करण्यास मान्यता.
  1. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-1949 च्या कलम 73 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.
  1. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा उपसा सिंचन प्रकल्पास (ता. मंगळवेढा) फेररचनेसह सुधारित प्रशासकीय मान्यता.
  1. धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ (कनोली) उपसा सिंचन योजनेच्या प्रथम सुधारित मान्यतेमधील काही अटी शिथिल करण्याचा निर्णय.
  1. महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम-1961 मधील कलम 17, 18 व 23 अ मध्ये सुधारणा करणार.
  1. दी नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहीब अधिनियम-1956 मध्ये सुधारणा.
  1. कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमामध्ये सुधारणा.

COMMENTS