आता एसटी डेपोमध्ये चित्रपटगृहे !

आता एसटी डेपोमध्ये चित्रपटगृहे !

मुंबई – एसटी बसनं प्रवास करणा-या प्रवाशांसाठी राज्य सरकारनं आता राज्यातील बस डेपोंमध्ये चित्रपटगृहे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. नव्यानं बांधण्यात येणा-या काही बस डेपोंमध्ये ६० आसनांची छोटी चित्रपटगृहे सुरु करणार असल्याची माहिती दिवाकर रावते यांनी दिली आहे. आज राज्यभरातील एसटी वाहक-चालकांना नव्या गणवेशाचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही घोषणा केली आहे.

दरम्यान एसटी महामंडळाची महाराष्ट्रात 609 बस स्थानके आहेत. त्यापैकी 568 बस स्थानके सध्या वापरात आहेत. तर यातील 80 बस स्थानकाचे नुतनीकरण येत्या वर्षभरात केले जाणार असल्याची माहिती रावते यांनी दिली आहे. तसेच नव्याने बांधण्यात येणाऱ्या काही बस स्थानकावर रावते यांच्या संकल्पनेतून 60 आसनांची छोटी चित्रपटगृहे बांधण्यात येणार आहेत. तसेच हे चित्रपटगृहे फक्त मराठी चित्रपटांसाठी राखीव असणार असल्याची माहिती रावते यांनी दिली आहे. राज्य सरकारनं केलेल्या या घोषणेमुळे बस स्थानकांवर तासनतास वाट पहावी लागणा-या प्रवाशांचं मनोरंजन होणार आहे.

COMMENTS