सिंधुदुर्गात नारायण राणेंचेच वर्चस्व !

सिंधुदुर्गात नारायण राणेंचेच वर्चस्व !

सिंधुदुर्ग – माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या समर्थ विकास पॅनेलने एकहाती यश मिळवून सिंधुदुर्गात नारायण राणेंचेच वर्चस्व असल्याच दिसून आले आहे. समर्थ विकास पॅनेलने 156, शिवसेना 84 , भाजप 51  ग्राम पंचायती आल्याचा दावा केला आहे.

समर्थ विकास पॅनेलच्या वतीने आ. नितेश राणे यांनी सर्वाधिक सरपंच मिळाल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे नेते आ. वैभव नाईक यांनी, भाजपचे नेते जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी विविध ग्राम पंचायतीवर आपले वर्चस्व असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी पक्षाने सावंतवाडी तालुक्यातील कास ग्राम पंचायतीवर दावा केला. मनसेने निगुडे ग्राम पंचायतीवर सत्ता प्रस्थापित केली आहे. या निवडणुकीमध्ये काही दिग्गजांनाही पराभव पत्करावा लागला असून काँग्रेसच्या हाती भोपळा आला.

कणकवली तालुक्यात 46 सरपंच समर्थ पॅनेलचे विजयी झाले आहेत. शिवसेनेला 2, भाजपला 4 तर ग्रामविकास पॅनेलचे 4 ठिकाणी सरपंच बसले आहेत. दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार सरपंचपदी विजयी झाले आहेत. वेंगुर्ले तालुक्यात आठ ग्राम पंचायतीवर समर्थ विकास पॅनेल, 7 ग्राम पंचायतीवर शिवसेना, 5 ग्राम पंचायतीवर भाजप तर 3 ग्राम पंचायतीवर गाव विकास पॅनेल विजयी झाले आहे. वैभववाडी तालुक्यामध्ये 14 ग्राम पंचायतीवर समर्थ विकास पॅनेलची सत्ता आली असून 2 ग्राम पंचायतीवर भाजप तर एका ग्राम पंचायतीवर ग्रामविकास पॅनेलची सत्ता आहे. सावंतवाडी तालुक्यातील 25 ग्राम पंचायतीवर समर्थ पॅनेल, 8 ग्राम पंचायतीवर शिवसेना, 17 ग्राम पंचायतीवर भाजप, एका ग्राम पंचायतीवर ग्रामविकास पॅनेल व एका ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे.

COMMENTS