उद्धव ठाकरेंच्या पंढरपुरातील सभेसाठी जोरदार तयारी, महासभेतून मिळणार पुढच्या राजकीय आखाड्याचे संकेत !

उद्धव ठाकरेंच्या पंढरपुरातील सभेसाठी जोरदार तयारी, महासभेतून मिळणार पुढच्या राजकीय आखाड्याचे संकेत !

पंढरपूर – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूरमध्ये महासभा आहे. या महासभेकडे राज्याचं लक्षलागलं आहे. या महासभेसाठी जोरदार तयारी सुरु असून आतापासूनच शिवसैनिकांची गर्दी पंढरपुरात पहावयास मिळत आहे. ही महासभा ऐतिहासिक करण्यासाठी शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार तानाजी सावंत, शिवाजी सावंत आदी तळ ठोकून आहेत.

दरम्यान शिवसेनेने शक्तिप्रदर्शनासाठी तब्बल 27 एकरावर पसरलेल्या चंद्रभागा मैदानाची निवड केली आहे.राज्यभरातून पाच लाखापेक्षा जास्त शिवसैनिक या सभेला येणार आहेत. या महासभेतून पुढच्या राजकीय आखाड्याचे संकेत मिळणार असल्याने त्यामुळे या सभेला फारच महत्व प्राप्त झाले आहे .

COMMENTS