शिवसेनेचा आता महाराष्ट्रात ‘माऊली संवाद’ उपक्रम !

शिवसेनेचा आता महाराष्ट्रात ‘माऊली संवाद’ उपक्रम !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असल्याचं दिसत आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेला आजपासुन सुरुवात होत आहे. तर राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन केलं जात आहे. तसेच शिवसेनेचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ‘आदित्य संवांद’च्या माध्यमातून तरूणांना आकर्षित केले जात आहे. असे असतानाच आता राज्यातील महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनेकडून माऊली संवाद उपक्रम राबविला जाणार आहे. शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर आता महाराष्ट्रातील महिलांशी ‘माऊली संवाद’ च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला व्होट बँक काबीज करण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं असून ‘माऊली संवाद’ या उपक्रमाची सुरवात पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातून २ आँगस्ट पासून होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेनं होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकरांनाच मैदानात उतरवले असल्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेला कितपत फायदा होणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS