शरद पवार आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर !

शरद पवार आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर !

मुंबई  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी यांच्या पुस्तक प्रकाशनानिमित्त हे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहे. मनोहर जोशींनी लिहलेल्या ‘अवघे पाऊणशे वयमान’ या पुस्तकाचे प्रकाशन आज सायंकाळी ५.०० वाजता होणार आहे.  हा कार्यक्रम दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये पार पडणार असून उद्धव ठाकरे आणि शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी काल शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तसेच या कार्यक्रमाला देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS