सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी – शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा

सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी – शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा

मुंबई – ‘दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्याची गांर्भियाने दखल घेतली नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करुन घेतील, अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी,’ अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषी मंत्रीरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नावर शरद पवार विरोधी पक्षातील नेत्यांसह रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत पंजाब, हरयाणासह देशातील इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येनं शेतकरी दाखल झाले आहेत.  पाचव्या फेरीतही केंद्राकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे.

पवार म्हणाले, ‘शेती आणि अन्न पुरवठा या बाबतीत पंजाब व हरयाणातील शेतकऱ्यांचं योगदान अधिक आहे. गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनात, तर सगळ्यात देशाची गरज या शेतकऱ्यांनी भागवली. जगातील १६ ते १८ देशांना धान्य पुरवठा भारत करतो. त्यात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा वाटा फार मोठा आहे. याची केंद्र सरकारने दखल घ्यायला हवी होती. पण ती घेतलेली दिसत नाही,’ अशी खंत व्यक्त केली आहे.

COMMENTS