पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केली भूमिका स्पष्ट!

पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केली भूमिका स्पष्ट!

मुंबई – राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा होती. परंतु असं असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची चर्चा आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार राष्ट्रवादीमधून अजित पवारांची हकालपट्टी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तत्पूर्वी अजित पवारांवर मोठी कारवाई करण्यात आली असून त्यांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष विरोधी कारवाई केली म्हणून ही हकालपट्टी करण्यात आली आहे.

यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवारांचा निर्णय पक्षाच्या विरोधात असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाणार नाही – शरद पवार

6:30 वाजता राजभवनावरील हालचालीची माहिती मिळाली -शरद पवार

जे सदस्य अजितदादांसोबत गेले त्यांना आधीच माहिती होती -शरद पवार

आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत – शरद पवार

गेले त्यांच्यावर पक्षांतराची कारवाई –
शरद पवार

डॉ. शिंगणे थेट शपथविधीनंतर घरी आले -शरद पवार

अजितदादांचा रात्री 10 वाजता फोन आला,सकाळी 7 वाजता धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर येण्याचा निरोप आला – डॉ. शिंगणे

आम्हाला राजभवनात नेलं परंतु याची कल्पना आम्हाला नव्हती -डॉ. शिंगणे

मी राष्ट्रवादीसोबतच आहे – डॉ. शिंगणे

मलाही न सांगता राजभवनावर नेलं – जयदत्त ‌क्षीरसागर

यादी तयार करुन आमदारांच्या सहाय करुन ठेवल्या होत्या, ही यादी अजित पवारांकडे होती – शरद पवार

उद्धव ठाकरे

राज्यात लोकशाहीचा खेळ सुरु आहे.

आमचं राजकारण उघड उघड आहे.

त्यांच्यासारखा आमचा रात्रीस खेळ चालत नाही.

COMMENTS