…तर सत्ताधा-यांविरोधात न्यायालयीन लढाई लढणार – शरद पवार

…तर सत्ताधा-यांविरोधात न्यायालयीन लढाई लढणार – शरद पवार

मुंबई – कोकण पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकीसाठी आज आघाडीतर्फे कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.  नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृह याठिकाणी हा मेळावा घेण्यात आला. यावेळी आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. यावेळी शरद पवार यांच्यासह कॉग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, समाजवादी पार्टी , आरपीआयचे सर्व नेते उपस्थित होते.  ही आघाडी फक्त कोकण पदवीधर मतदार संघा पुरती नसून येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तालीम असल्याचे आवाहन यावेळी नेते मंडळींकडून करण्यात आलं.

दरम्यान यावेळ शरद पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. जर निवडणूक आयोग सत्ताधां-यांच्या हाताचे बाहुली बनत असेल तर मात्र न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे यावेळी शरद पवार यांनी सांगितले आहे. राज्य आल्यानंतर सत्तेचा गैरवापर कसा करता येईल हा एककलमी कार्यक्रम सत्ताधा-यांचा (भाजपाचा) सुरु असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या घरावर छापे टाकले. संस्थांचा गैरवापर करून विरोधकांविरोधात छापेमारी करण्यात आली. तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या कार्यकर्त्यांवर चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. सर्व ठिकाणी आपली सत्ता आणण्यासाठी विरोधी पक्षांवर गुन्हे दाखल करायचं काम सुरू असल्याची जोरदार टीकाही यावेळी पवार यांनी केली आहे.

दरम्यान उद्योग घराणं असलेल्या टाटांच्या एनजीवो संस्थांचे काम पाहणा-या अधिका-यांवर छापेमारी करून दबाव आणण्याचे काम सुरू असून शेतक-यांची आवस्था खराब आहे . शेतक-यांनी रस्त्यावर शेतीमाल टाकण्यापेक्षा गरीबांना देवून निषेध करा असं आवाहनही पवार यांनी यावेळी केलं आहे. तसेच आमची सत्ता असताना शेतक-यांचे पूर्ण कर्ज माफ केले होते. शेतक-यांना कर्जावरील व्याज ४ टक्यांवर आणले. लोकांचं मत आणि मन बदलायला लागलं असून, मतदान यंत्रातील बिघाड याबाबत  सर्व पुरावे निवडणूक आयोगाला देणार आहोत असंही पवार यांनी म्हटलं आहे. तसेच उत्तर प्रदेशसह  इतर राज्यात भाजप पोटनिवडणुकीत हारले आहे. पालघर पोटनिवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांना राष्ट्रवादी, काँग्रेसने पाठिंबा दिला असता तर निकाल वेगळा लागला असता . परिवर्तन करायचं असेल, लोकांना पर्याय द्यायचा असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असंही यावेळी पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान साम, दंड, भेदाचा वापर करून निवडणूक जिंकण्याचा संदेश राज्य प्रमुखाने दिल्यावर सर्वांचा वापर करून निवडणुकीत गैरप्रकार सुरू झाला असल्याचा आरोपही यावेळी शरद पवार यांनी केला आहे.

COMMENTS