संभाजी भिडे, एकबोटेंनी वेगळं वातावरण तयार केलं, भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांचे गंभीर आरोप!

संभाजी भिडे, एकबोटेंनी वेगळं वातावरण तयार केलं, भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांचे गंभीर आरोप!

मुंबई – भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भीमा-कोरेगाव हिंसा प्रकरणात संबंध नसलेल्या व्यक्तींवर खटले भरले असून यात कोरेगाव-भीमा आणि एल्गार परिषदेचा संबंध नव्हता. ही परिषद दोन तीन दिवस आधी झाली. मात्र जे तिथे नव्हते त्यांच्यावरही खटले भरले गेले. संभाजी भिडे आणि एकबोटे यांनी या ठिकाणी वेगळं वातावरण तयार करण्याचं काम केलं असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान कोरेगाव भीमा, एल्गार याबाबत राज्यात सध्या चर्चा सुरू आहे. कोरेगाव भीमा इथे स्तंभाला वंदन करायला अनेक वर्ष लोक येत आहेत. इथे येणारे लोक आणि आजूबाजूच्या गावातील लोकांमध्ये चांगले संबंध होते. या परिषदेत भाषणं केली. त्याबाबत पोलीसांची रिपोर्ट सादर केला गेला. यात कोण हजर होत़, कोण काय बोललं हे आहे. खटले भरण्यात आले त्यात हजर नव्हते त्यांच्यावर खटले भरून त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे असंही पवार यांनी म्हटलं आहे.

सुधीर ढवळे यांनी कविता वाचली म्हणून तुरुंगात टाकले. त्यांनी नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठा काव्यसंग्रहातील कविता वाचली होती. ही कविता ग्रामीण भागातील स्त्रीयांवर अत्याचार होते त्यावर आहे. या काव्य संग्रहाला राज्य आणि केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.

तसेच ढवळे यांनी जामीन मिळावा म्हणून प्रयत्न केला पण तो मिळाला नाही. कारण राज्य सरकारने याबाबत कोर्टासमोर जी माहिती ठेवली त्याला सत्याचा आधार नव्हता. पुरावे असे दिले की जामीन मिळाला नाही.असत्यावर आधारित पुरावे कोर्टात द्यायचे हे योग्य नाही. त्यामुळे मी प्रयत्न करतोय यांच्यावरचा अन्याय कसा दूर करता येईल. जामीन मिळाला नाही पण न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी याबाबत काही सवाल उपस्थित केले आहेत.

ही स्वतंत्र चौकशी झाली तर यातील सत्यता बाहेर येईल आणि ज्यांनी सत्तेचा गैरवापर केला ते उघडे पडतील.तुरुंगात गेलेत त्यांना न्याय मिळेल.याप्रकरणी स्वतंत्र चौकशी करायला हवी असं न्यायमूर्तीही म्हणतात. आमचीही तिच मागणी आहे.आमची तक्रार पुणे पोलीसांच्या वर्तनाबाबत आहे आणि त्यामागे असलेल्या राजकीय शक्तींची
एसआयटी चौकशी करा अशीच मागणी आमची आहे असंही पवार म्हणालेत.

दरम्यान या तपासाबाबत गृहमंत्र्यांनी बैठक घेतली 11 वाजता आणि लगेच 4 वाजता केंद्र सरकारने एनआयएकडे तपास दिला.राज्य सरकार या प्रकरणात लक्ष घालतोय हे केंद्र सरकारला तातडीने कुणी कळवलं. या बैठकीला उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे उद्योग केले असावेत,
बैठकीतील माहिती बाहेर कशी गेली असा सवालही पवारांनी केला आहे.

COMMENTS