माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांची माघार?

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांची माघार?

पुणे – माढा लोकसभा मतदारसंघातून राष्टेरवादीचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक लढवणार होते. परंतु आता लोकसभा निवडणुकीतून शरद पवार माघार घेण्याची शक्यता आहे. माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहीते पाटील यांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह शरद पवार यांनी केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यात बारामती हॉस्टेलमध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरू असून या बैठकीत पवारांनी आग्रह धरला असल्याची माहिती आहे.

दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी पवार यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारसंघात आढावा बैठकीही घेतल्या होत्या परंतु मोहीते पाटील समर्थकांनी विजयसिंह मोहीते पाटील यांनाच उमेदवारी देण्याचा सूर धरला आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहीते पाटील यांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह शरद पवार यांनी केला असल्याची माहिती आहे.

 

COMMENTS