कोल्हापूर – महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची मतं काँग्रेसच्या पारड्यात !

कोल्हापूर – महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची मतं काँग्रेसच्या पारड्यात !

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना आणि काँग्रेसची जवळीकता पहायला मिळाली आहे. कारण या महापौरपदासाठी शिवसेनेची सर्व मते काँग्रेसच्या पारड्यात पडली आहेत. त्यामुळे अपेक्षेप्रमाण काँग्रेसच्या स्वाती यवलुजे यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे. स्वाती येवलुजे याना ४८ मते मिळाली तर विरोधी भाजपा ताराराणी आघाडीचे उमेदवार मनीषा कुंभार यांना ३३ मते मिळाली आहेत. तसेच उपमहापौरपदी रास्ट्रवादीचे उमेदवार सुनील पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सुनील पाटील यांना ४८ मते मिळाली तर भाजपा ताराराणी आघाडीचे  उमेदवार कमलाकर जगदाळे यांना ३३ मते मिळाली. शिवसेनेची ४ मते काँग्रेसच्या पारड्यात पडल्यामुळे काँग्रेसला महापौर आणि उपमहापौरपद मिळवण्यास मदत झाली.

यापूर्वीही काँग्रेस आणि शिवसेनेची जवळीकता पहायला मिळाली आहे. नांदेड महापालिकेतही काँग्रेसला शिवसेनेनं साथ दिली तर ठाणे झेडपीत काँग्रेसनं शिवसेनेला साथ दिली. त्यामुळे या दोन्ही पक्षांची वाढती जवळीकता पाहता पुढील काळात काँग्रेस शिवसेना हा नवीन पॅटर्न तयार होतो की काय अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

COMMENTS