माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग राजकारणाच्या खेळपट्टीवर ?

माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग राजकारणाच्या खेळपट्टीवर ?

नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग राजकारणाच्या खेळपट्टीवर नवी इनिंग सुरू करणार असल्याची माहिती आहे. सेहवाग आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. भाजपकडून सेहवागला हरियाणातील रोहतक मतदारसंघातून उतरवलं जाणार आहे. रोहतक मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्र हुडा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात भाजपकडून सेहवागला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेटप्रमाणेच राजकीय क्षेत्रातही सेहवाग चमकणार का हे पाहणं गरजेचं आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित असलेल्या हरियाणातील एका भाजप नेत्यानं सेहवागच्या राजकारण प्रवेशाचे संकेत दिले असल्याची माहिती आहे. याबाबत सेहवागशी अजून चर्चा झाली नसून भाजप नेते लवकरच सेहवागची भेट घेऊन त्याला ही ऑफर देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सेहवाग भाजपची ऑफर स्वीकारून निवडणुकीच्या मैदानात उतरणार का हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS