लॉकडाऊनच्या कालावधीत शाळांची फी भरण्याबाबत पालकांवर सक्ती करू नये, शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रक !

लॉकडाऊनच्या कालावधीत शाळांची फी भरण्याबाबत पालकांवर सक्ती करू नये, शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रक !

मुंबई – लॉकडाऊनच्या कालावधीत शाळांची फी भरण्याबाबत पालकांवर सक्ती करू नये असं परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहे. चालू वर्षाची तसेच पुढील वर्षाची फी भरण्यासाठी शाळांनी सक्ती करू नये असं शिक्षण विभागाने म्हटलं आहे. तसेच फी भरण्यासाठी पालकांना कालावधी वाढवून देण्याची विनंतीहा शिक्षण विभागाने सर्व बोर्डाच्या शाळांना केली आहे. पालकांकडून चालू वर्षाची आणि आगामी वर्षाची फी गोळा करताना सहानुभूती दाखवावी तसेच लॉकडाऊन संपल्यानंतर शाळेची फी जमा करण्याबाबत सूचना देण्याची कार्यवाही करावी असंही शिक्षण विभागाने म्हटलं आहे.

दरम्यान राज्यातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या 3202 वर पोहचली आहे. दिवसभरात 5 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. यासह आतापर्यंत राज्यभरात 300 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 56 हजार 673 कोरोना चाचणी झाल्या आहेत. त्यापैकी 52 हजार 762 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना चाचणीत निगेटिव्ह आले आहेत, तर 3202 जण पॉझिटिव्ह आले आहेत.तसेच राज्यात 71,076 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 6108 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

COMMENTS