सचिन तेंडूलकरचं नितीन गडकरींना पत्र, गंभीर दखल घेण्याची विनंती !

सचिन तेंडूलकरचं नितीन गडकरींना पत्र, गंभीर दखल घेण्याची विनंती !

मुंबई – भारताचा माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा सदस्य सचिन तेंडुलकरनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलं आहे. देशातील वाढत्या अपघातांबाबत सचिननं हे पत्र लिहिलं आहे. देशामध्ये अपघातांची संख्या वाढत असून या अपघातांमुळे अनेकांचे जीव जात आहेत. तसेच देशातील 70 टक्के दुचाकीस्वार हे बनावट हेल्मेट वापरत आहेत. या बनावट हेल्मटेमुळे त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे बनावट हेल्मेट बनवणाऱ्या कंपनीवर कारवाई करणे गरजेचे असल्याचं सचिननं म्हटलं आहे. तसेच देशातील 30 टक्के अपघात हे दुचाकीवर होत आहेत. त्यामुळे तुम्ही यामध्ये लक्ष घालून या कंपन्यांवर कारवाई करावी अशी विनंती सचिननं गडकरींना केली आहे.

दरम्यान क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना जर हेल्मेट चांगले नसेल तर खेळाडूचा जीव जाऊ शकतो. तसेच दुचाकीस्वारांचेही असून जर त्यांच्याकडे चांगले हेल्मेट नसेल तर त्यांच्याही जीवाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे हा फार गंभीर विषय असून याची तुम्ही दखल घ्यावी असं सचिननं म्हटलं आहे. दरम्यान सचिननं लिहिलेल्या या पत्राला नितीन गडकरी काय उत्तर देणार आहेत. तसंच याची दखल घेऊन ते दशभरातील अनेक बनावट कंपन्यांवर कारवाई करणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

 

 

COMMENTS