“मोदींच्या इच्छेखातर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा विश्वासघात!”

“मोदींच्या इच्छेखातर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा विश्वासघात!”

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेखातर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विश्वासघात केला असल्याचं टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. गुजरातमधील वित्तीय केंद्रासाठी मुंबईतील प्रस्तावित जागतिक वित्तीय केंद्राला पूर्णविराम देण्यात आल्यामुळे सचिन सावंत यांनी ही टीका केली आहे. जोपर्यंत गुजरातमधील जागतिक वित्तीय केंद्राचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही तोपर्यंत दुसरे जागतिक वित्तीय केंद्र उभारता येणार नाही, अशी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी संसदेत माहिती दिली आहे. त्यानंतर सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

दरम्यान मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने जागतिक वित्तीय केंद्र मुंबईत करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता.मात्र भाजपा सरकारने हे वित्तीय केंद्र गुजरातला नेले आणि त्याचा विरोध मुख्यमंत्र्यांनी केला नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेखातर मुंबईचं हक्काचं आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गांधीनगरला गेलं. हा मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांनी राज्यातील जनतेचा केलेला विश्वासघात आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच  एकेक करुन महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत, हा महाराष्ट्राचं आर्थिक महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे.

COMMENTS