RTO मध्ये भ्रष्टाचार होतो, पण त्याला जनताच जबाबदार – दिवाकर रावते

RTO मध्ये भ्रष्टाचार होतो, पण त्याला जनताच जबाबदार – दिवाकर रावते

नाशिक – RTO मध्ये लायसन्स काढताना भ्रष्टाचार होतो अशी कबुली देतानाच या भ्रष्टाचाराला  लायसन्स काढणारी जनताच जबाबदार असते असं धक्कादायक विधान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं आहे. नाशिकमध्ये एसटी कर्मचा-यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. लायसन्स काढण्यासाठी जाणा-या लोकांना वेळ नसतो. आणि त्यांना लायसन्स तातडीनं हवं असतं. त्यामुळे ते दलाल पकडतात. तो दलाल मग त्याची किंमत सांगतो 10 हजार रुपये. त्यापैकी तो साडेनऊ हजार रुपये घेतो आणि फक्त 500 रुपये अधिका-याच्या हातात ठेवतो असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे या भ्रष्टाचाराला अधिकारी जबाबदार नसून दलाल आणि दलालाला पैसे देणारे जबाबदर असल्याचं रावते म्हणाले. आयुष्यात एकदाच लायस्नस काढायचं असंत, पण तुम्हाला त्यासाठी एक दिवसही देता येत नाही का ?  असा सवाल करत त्यांनी जनतेलाच आरोपीच्या पिंज-यात उभं केलं.

रावते साहेब सर्वसामान्य जनतेला 10 हजार असो किंवा 5 हजार रुपये असो ही फार मोठी रक्कम आहे. त्याला दललाला पैसे द्यायला खूप गंमत वाटते किंवा तो स्वखुशीनं देतो असंही नाही. तर तसे पैसे द्यायला त्यांना भाग पाडलं जातं. त्या पिचलेल्या सर्वसामान्य जनतेला तुमचे अधिकारी लाच द्यायला भाग पाडतात. एखाद्या RTO  च्या केंद्राला तुमची ओळख न दाखवता भेट द्या. म्हणज्ये तिथं काय होतंय ते तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर तुम्ही भ्रष्टअधिका-यांना पाठिशी घालणार नाहीत. सर्वच अधिकारी भ्रष्ट आहेत असं आम्ही म्हणत नाहीत. पण बहुतेक अधिकारी भ्रष्ट आहेत. त्यांची आणि दलालांची एक साखळीच तयार झालेली असते. दलालाशिवाय गेल्यावर अनेक वेळा त्याला हेलपाटे घालायला लावले जातात. पुन्हा पुन्हा परिक्षेत नापास केलं जातं. त्यामळे काहीजण त्याच्यातून सुटका करुन घेण्यासाठी दलालाची मदत घेतात.

COMMENTS