रोहीत पवारांनी दिले विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत, ‘या’ मतदारसंघातून लढणार ?

रोहीत पवारांनी दिले विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत, ‘या’ मतदारसंघातून लढणार ?

पुणे – राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. माझ्या गेल्या काही वर्षाच्या कामातून माझी सामान्य माणसाशी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे मी विधानसभा लढणार हे नक्की आहे, पण माझा मतदारसंघ राष्ट्रवादीचे नेेते ठरवतील असं रोहीत पवार यांनी म्हटलं आहे. तसेच ते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून विधानसभा लढणार असल्याची चर्चा आहे. परंतु मी वरिष्ठ सांगतील त्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचंही रोहीत पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान रोहीत पवार हे विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा गेली काही दिवसांपासून सुरु आहे. परंतु  आज पहिल्यांदाच याबाबत रोहीत पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी मी पवार साहेबांच्या विचाराने काम करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी संपूर्ण महाराष्ट्र फिरत आहे. लोकांचे प्रश्न जाणून घेतले आहेत. ते प्रश्न सोडण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याच रोहीत पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS