शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांचे निधन !

शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांचे निधन !

धुळे – शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष रविभाऊ देवांग याचं निधन झाले आहे. ते मुळचे धुळ्याचे होते. शेतकरी मेळाव्यासाठी शेगाव येथे गेले असतांना त्यांना अचानक ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांना मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने शेतकरी आणि शेतकरी संघटनेची मोठी हानी झाली आहे. शेगाव येथे रात्री नऊ वाजच्या सुमारास त्याना अचानक छातीत दुखू लागलं आणि त्याच ठिकाणी मृत्युने त्यांना कवटाळलं. देवांग यांनी आपले संपुर्ण आयुष्य शेतकरी आणि संघटनेसाठी अर्पण केले होते. त्यांच्या पार्थिवावर धुळ्यात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांनी दिली आहे. अतिशय हसत खेळत काम करणारे आणि मनमिळावू अशी रवी देवांग यांची ओळख होती.

COMMENTS