“मंत्रालयात काँग्रेसने उंदीर सोडले ?”

“मंत्रालयात काँग्रेसने उंदीर सोडले ?”

मुंबई – मंत्रालयातील उंदीर मारण्याच्या प्रकरणाची खमंग चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. भाजपचे आमदार चरण वाघमारे आणि एकनाथ खडसे यांनी या प्रकरणावरुन भाजपची पुरती कोंडी केली. मुंबई महापालिका वर्षभरात जेवढे उंदीर मारते जवळपास तेवढे उंदीर मंत्रालयात केवळ 7 दिवसात मारण्यात आले. आता मंत्रालयात एवढे उंदीर कुठून आले ? एवढ्या मोठ्या प्रमाणात उंदीर मारल्यानंतर त्याची विल्हेवाट कुठे लावण्यात आली. याबाबत काहीही माहिती समोर येत नाही. भाजपच्या नेत्यांना या आरोपाची उत्तरं देताना पुरती दमछाक होत आहे.

रामदास आठवले यांनी या प्रकरणाचा आपल्या खुमासदार शैलीत समाचार घेतला. मी मंत्री असताना मंत्रालयात एकही उंदीर नव्हता. आता आमचं सरकार आल्यामुळं कदाचित मंत्रालयात काँग्रेसनं उंदीरे सोडली असतील अशा शब्दात या उंदीर प्रकरणावर आठवले यांनी भाष्य केलं. या उंदीर प्रकरणावर रोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. कंत्राटदार कंपनीचा जो पत्ता होता. तो पत्ता चुकीचा आहे. ज्याच्या नावावर कंत्राट घेतले तो व्यक्तीही हयात नाही. त्यामुळे आता सरकार या प्रकरणावर कशाप्रकारे तोंड देते ते पहावं लागेल.

COMMENTS