कोकण विधान परिषद निवडणुकीत नारायण राणेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा ?

कोकण विधान परिषद निवडणुकीत नारायण राणेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा ?

रत्नागिरी – कोकण विधान परिषद निवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचं नारायण राणे यांनी जाहीर केलं आहे. परंतु शिवसेनेच्या उमेदवारालाही जिंकू देणार नसल्याचं राणे यांनी म्हटलं असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. या निवडणुकीसाठी नारायण राणे यांच्याकडे निर्णायक 96 मते आहेत. तसेच याबाबत ते येत्या सोमवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडणार आहेत.

दरम्यान याबाबतची घोषणा करण्यापूर्वी नारायण राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या व्यूहरचनेच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा देणार आहेत का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे..

COMMENTS