संजय राऊत तिखट असले तरी आम्ही चिकट आहोत – रामदास आठवले

संजय राऊत तिखट असले तरी आम्ही चिकट आहोत – रामदास आठवले

मुंबई – महायुतीतील मित्र पक्षांची बैठक आज बैठक पार पडली. या बैठकीला आरपीयचे (ए)रामदास आठवले,रासपा महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे,रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत उपस्थित होते. यावेळी बोलत असताना रामदास आठवले यांनी सगळंच मागून मिळत नाही. आरपीआयला मात्र कॅबिनेट मंत्रीपद मिळावे असं म्हणाले आहेत. तसेच महाराष्ट्रातल्या जनतेचा जनादेश महायुतीच्या बाजूने आहे. जनतेचे आभार मानण्याचा ठराव केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला असून मुख्यमंत्री बनण्यात त्यांना आता अडचण नाही असंही आठवले म्हणाले आहेत.

तसेच मंत्रिमंडळ लवकर बनवावे.
आमच्या चार पक्षांना चार मंत्रिपद मिळावी अशी अपेक्षाही रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. मीत्र पक्षांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असावे अस वाटतंय तर उद्धव ठाकरे नेते असावेत. शिवसेनेला दोन तीन मंत्रिपद वाढवून मिळू शकतात.अमित शाह मुंबईत येणार आहेत त्यावेळी चर्चा होईल. उद्धव आणि सीएम यांचे संबंध चांगले आहेत. दोघांनी एकत्र येऊन मार्ग काढावा असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.

तसेच संजय राऊत यांची भूमिका हळूहळू बदलत आहे. शिवसेना सरकारमध्ये येणार आहे. त्यामुळे संजय राऊत तिखट असले तरी आम्ही चिकट आहोत असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

भाजप -शिवसेना युती सोबत असणारे मित्र पक्ष आणि त्यांचे निवडून आलेले आमदार

1) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)

राम सातपुते,माळशिरस,सोलापूर

राजेश पवार,नायगाव, नांदेड

2) महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्ष

डॉ रत्नाकर गुट्टे ,गंगाखेड , परभणी

3) विनायक मेटे-शिवसंग्राम पक्ष

डॉ.भारती लव्हेकर, वर्सोवा ,मुंबई

भीमराव केराम किनवट नांदेड

स्वेता महाले चिखली बुलढाणा

4) सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटना

सचिन कल्याणशेट्टी,अक्कलकोट, सोलापूर

COMMENTS