राज्यसभेच्या चौथ्या जागेवरुन काँग्रेस – राष्ट्रवादीत रस्सीखेच, सतीश चतुर्वेदींसाठी काँग्रेस आग्रही!

राज्यसभेच्या चौथ्या जागेवरुन काँग्रेस – राष्ट्रवादीत रस्सीखेच, सतीश चतुर्वेदींसाठी काँग्रेस आग्रही!

मुंबई –  26 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीवरून महाविकासआघाडीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.राज्यसभेच्या चौथ्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने माजी मंत्री फौजिया खान यांचं नाव निश्चित केलं असतानाच काँग्रेस सतीश चतुर्वेदींसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या कोट्यातील राज्यसभेच्या सात जागा 2 एप्रिलला रिक्त होणार आहेत. यात महाविकास आघाडीला 4 जागा मिळणार आहे. त्यापैकी राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत. एका जागेवर राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. तर दुसय्रा जागेसाठी फौजिया खान यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. परंतु अशी कुठलीच चर्चा झाला नसल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

दरम्यान राज्यसभेच्या चार जागांचे वाटप तीन पक्षांमध्ये कसे करायचे, यावरून वाद निर्माण झाला आहे. चौथी जागा लढवण्यासाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार शिवसेना हा महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीसाठी परस्पर शरद पवार आणि फौजिया खान यांची नावे निश्चित करून दोन जागा आपल्याकडे घेतल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाल्याची माहिती आहे.चौथ्या जागेचा निर्णय हा समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात यावा, असा काँग्रेसचा आग्रह आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS