‘’राहुल गांधी राजकारणातील अयशस्वी खेळाडू आहेत’’

‘’राहुल गांधी राजकारणातील अयशस्वी खेळाडू आहेत’’

रायपूर – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे राजकारणातील अयशस्वी खेळाडू आहेत, अशी खोचक टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 
योगी आदित्यनाथ म्हणाले, राहुल गांधी हे राजकारणातील अयशस्वी खेळाडू आहेत. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय निश्चित आहे. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपची पुन्हा एकदा एकहाती सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे नेते जेथे स्वत:ला ते फार सक्रीय असल्याचे दाखवतात तेथेच पक्षाला पराभवाचा सामना करावा लागतो, असेही ते  म्हणाले.

 

COMMENTS