केंद्रीय कृषीमंत्रीच म्हणतायेत, शेतमालाला आधारभूत किंमत मिळत नाही !

केंद्रीय कृषीमंत्रीच म्हणतायेत, शेतमालाला आधारभूत किंमत मिळत नाही !

नवी दिल्ली – शेतमालाला योग्य आणि किफायतशीर भाव मिळावा म्हणून विरोधक नेहमीच मागणी करत असतात. सरकार त्याच्या परिने ते करण्याचा प्रयत्न करतं. त्यासाठी सरकार शेतमालाला किफायतशीर भाव ठरवून देतं. मात्र सरकारनं ठरवून दिलेला किफायतशीर भाव किंवा आधारभूत किंमत शेतक-यांना मिळत नसल्याचं कोणी विरोधी पक्ष नाही तर खुद्द देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंह म्हणत आहेत. काल राज्यसभेत बोलताना राधामोहनसिंह यांनी ही कबुली दिली आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या भागातील अनुभवावरुन हे मी सांगत असल्याचं ही राधामोहनसिंह म्हणाले.

खरंतर योग्य आणि किफायतशीर भाव देणं तो मिळत नसेल तर आधारभूत किंमत देणं ही सरकारची जबाबदारी आहे. जर केंद्रीय कृषीमंत्रीच असं बोलत असतील कर मग शेतक-यांनी जायचं कुठे ? आधारभूत किमंत न मिळण्याला जबाबदार कोण आहे ? ही देशाच्या कृषीमंत्र्यांची हतबलता आहे का ? तुम्ही मग जे याच्यातील दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत ? असे एक ना अनेक प्रश्न शेतक-यांना पडत आहेत.

COMMENTS