पुणे विद्यापीठात दिग्गजांची सरशी, मुख्यमंत्र्यांच्या भावाचा विजयासाठी संघर्ष तर अजित पवारांच्या पत्नी बिनविरोध !

पुणे विद्यापीठात दिग्गजांची सरशी, मुख्यमंत्र्यांच्या भावाचा विजयासाठी संघर्ष तर अजित पवारांच्या पत्नी बिनविरोध !

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सीनेटच्या निवडणुकीत दिग्गज उमेदवारांनी विजय मिळवला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीत बिनविरोध विजयी झाल्या. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाऊ प्रसेनजित फडणवीस यांना मात्र विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. मतमोजणीच्या अंतिम टप्प्यापर्य़ंत त्यांना विजयासाठी झगडावं लागलं.

सिनेटमध्ये सुनेत्रा पवार बिनविरोध जिंकल्या असल्या तरी त्यांच्या पॅनला मात्र पराभूत व्हावं लागलंय. अभाविप प्रणित एकता पॅनेलनं विजय मिळवला आहे. व्यवस्थापनच्या  ५ तर पदवीधरच्या १० जागांसाठी ही निवडणूक झाली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीत एकता पॅनेलला एकूण १० तर काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे आघाडी प्रणित प्रगती पॅनेलला एकूण ५ जागांवर विजय मिळालाय.

COMMENTS