राज्यात राष्ट्रपती राजवट लागू, असा चालणार राज्याचा कारभार!

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू, असा चालणार राज्याचा कारभार!

मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपालांच्या शिफारस पत्रकावर सही केली आहे. त्यामुळे आता राज्याचा कारभार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पाहणार आहेत. राज्याचा कारभार चालवण्यासाठी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यांच्या चर्चेनंतर 3 सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. हे सनदी अधिकारी राज्यपालांचे सल्लागार म्हणून काम करणार आहेत.

दरम्यान तसेच राष्ट्रपती राजवटीचा अधिकाधिक कालावधी 6 महिन्यांपर्यंत असणार असून त्यानंतर हा काळ कायदेशीर प्रक्रियांच्या मान्यतेनंतर वाढवता देखील येईन. या व्यतिरिक्त राज्यपाल सत्तास्थापनेची कोणतीही शक्यता दिसत नसल्यास मध्यावधी निवडणुकांचीही घोषणा करु शकतील असा अंदाज कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

आमदारांचं विधानसभा सदस्यत्व कायम राहणार

आमदारांचं विधानसभा सदस्यत्व कायम राहणार असून जोपर्यंत विधानसभा बरखास्त करण्यात आल्याचं जाहीर होत नाही, तोपर्यंत विधानसभा स्थगित आहे, असं समजलं जाणार आहो. तसेच कोणत्याही पक्षाने बहुमत सिद्ध करण्याबाबत इच्छा व्यक्त केली, तर त्यांना सत्तास्थापन करता येणार असल्याचं कायदेतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

COMMENTS