‘या’ अटीवर काँग्रेसबरोबर युती करण्याची तयारी –प्रकाश आंबेडकर

‘या’ अटीवर काँग्रेसबरोबर युती करण्याची तयारी –प्रकाश आंबेडकर

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती करण्याची तयारी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर दर्शवली आहे. परंतु त्याची सुरुवात या महिन्यात होणाऱ्या भंडारा पोटनिवडणुकीत भारिपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन करावी, अशी अटी आंबेडकर यांनी काँग्रेसमोर ठेवली आहे. त्यामुळे काँग्रेकडून त्यांची अट मान्य केली जाणार का याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये दलित मते मिळविण्यासाठी त्यांच्या पक्षाबरोबर युती करण्याची काँग्रेसकडून चाचपणी केली जात आहे. या संदर्भात आंबेडकर यांना विचारले असता, आगामी लोकसभा निवडणुकीत युती करण्यास तयारी आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत समझोता करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या अटीनंतर आता काँग्रेस काय भूमिका घेणार आहे. याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS