मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या बंदोबस्तासाठी जाणा-या गाडीचा अपघात

मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या बंदोबस्तासाठी जाणा-या गाडीचा अपघात

धुळे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्ताला जात असलेल्या पोलीस गाडीचा अपघात झाला आहे. बॉम्बशोधक पथकाची पिंजरा गाडी पलटल्याने हा अपघात झाला असून नऊ पैकी चार ते पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्यची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

शिंदेखेडा येछे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी आज सकाळी शिंदखेडाकडे बंदोबस्तासाठी जात असताना सोनगीर फाट्याजवळ बॉम्बशोधक पथकाच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात नऊ पैकी चार ते पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

 

COMMENTS