पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘ती’ मुलाखत छापण्यास आघाडीच्या फ्रेंच वृत्तपत्राचा नकार !

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘ती’ मुलाखत छापण्यास आघाडीच्या फ्रेंच वृत्तपत्राचा नकार !

नवी दिल्ली – फ्रान्सचे ले मॉन्डे या आघाडीच्या दैनिकाने पंतप्रदान नरेंद्र मोदी यांची मुलाखत छापण्यास नकार दिला आहे. या वृत्तपत्राचे दक्षिण आशियाचे पत्रकार ज्युलिन बॉईसओ यांनी याबाबत ट्विट केलं आहे. ज्युलियन यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पंतप्रधानांची मुलाखत घेण्याबाबत विनंती केली होती. त्यास पंतप्रधान कार्यालयाने होकारही दिला. मात्र थेट मोदीँशी बोलून मुलाखत घेण्यास पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला आहे. तुम्ही तुमचे प्रश्न पाठवा. त्याची लेखी उत्तरे मेलवरुन पाठवू असं त्यांना सांगण्यात आलं आहे. मात्र ज्युलिन यांनी मात्र मोदी यांच्याशी थेट बोलण्याचा आग्रह धरला. त्यास पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला असल्यामुळे अशी मुलाखत आपण छापणार नाही असं वृत्तपत्राच्यावतीने सांगण्यात आलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरूवारी रात्री फ्रान्समध्ये पोहचले होते. मोदी हे तीन देशांच्या दौ-यावर गेले होते. या दौ-यात त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सीकोस होलांड यांच्याशी तसेच अनेक उद्योगपतींशी चर्चा केली आहे. व्यापार, संरक्षण यासह अनेक विषयांवर दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.

COMMENTS