‘मोदी काका का गावं’ शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला, पहा सिनेमाचा ऑफिशीएल टीझर !

‘मोदी काका का गावं’ शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला, पहा सिनेमाचा ऑफिशीएल टीझर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील सिनेमा अखेर येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेली 11 महिने हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कात्रित सापडला होता. पंतप्रधानांच्या विकासाच्या अजेंड्यावर प्ररित होऊन हा सिनेमा बनवण्यात आला आहे. पूर्वी या सिनेमाचं नाव मोदी का गांव असं होतं. मात्र आता त्यामध्ये बदल करुन मोदी काका का गांव असं करण्यात आलं आहे. एनडीडीव्ही या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिलं आहे.

सुरेश के झा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, पंजाब या राज्यातील सुमारे 600 चित्रपट गृहात झळकणार आहे. त्यानंतर दुस-या टप्प्यात देशभरातील इतर ठिकाणी या सिनेमाचं प्रमोशन होणार आहे. या सिनेमाचे पोस्टर मुंबईत विविध मल्टिप्पेक्स आणि इतर सिनेमागृहात लावण्यात आली आहेत.

गेल्या फेब्रुवारीमध्येच सिनेमा जवळपास तयार झाला होता. मात्र त्याला सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालं नाही. तब्बल 8 महिन्यानंतर म्हणज्ये नोव्हेंबरमध्ये या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदिल मिळाला. त्यामुळे सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. हा सिनेमा मोदींच्या जीवनावर आधारित नाही. मोदींच्या विकासाचं चित्र या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आलं आहे. अशी माहिती निर्माते झा यांनी दिली आहे.

COMMENTS