अजित पवारांनी घेतली भाजप नेत्याची भेट, घरवापसी करणार ?

अजित पवारांनी घेतली भाजप नेत्याची भेट, घरवापसी करणार ?

पिंपरी – चिंचवड – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज भाजप नेते आझम पानसरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आल असून पानसरे पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या आझम पानसरे यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.त्याचा चांगलाच फटका राष्ट्रवादीला बसला होता.

दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला तरी आझम पानसरे यांना काहीच फायदा झाला नाही, उलट त्यांचा वापर केल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आझम पानसरे आजारी असल्याने ही भेट झाल्याचे सांगण्यात येत असले तरी लोकसभा निवडणुकीपूर्वी ही भेट झाल्याने पानसरे यांच्या घरवापसीची चर्चा ही सुरू झाली आहे.

COMMENTS