आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन देणार -मुख्यमंत्री

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन देणार -मुख्यमंत्री

नागपूर – शुक्रवारी झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपचे आमदार एकनाथ खडसे यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन कधी देणार असा प्रश्न उपस्थित केला होता. एकनाथ खडसेंच्या या प्रश्नाला उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत याबाबत निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

दरम्यान आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्यांना 7 ते  8 राज्यात स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे दर्जा देण्यात आला आहे. तसेच त्यांना पेन्शनही मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीलही आणीबाणीच्या काळात तरुंगवास भोगणा-यांना कधी पेन्शन देणार असा प्रश्न एकनाथ खडसेंनी केला होता. याबाबत बोलताना आपल्या राज्यातही हा निर्णय घेण्यात येणार आहे, तसा प्रस्तावही तयार आहे, पण या सगळ्यांची माहिती गोळा करायला वेळ जात आहे, त्यामुळे नवीन वर्षाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनामुळे लवकरच आणीबाणीच्या काळात तरुंगवास भोगणा-या राज्यातील व्यक्तींना दिलासा मिळणार असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS