काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य !

काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य !

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात राज्यात आगामी निवडणुकीसाठी आघाडी होणार असे संकेत दोन्ही पक्षांकडून दिले जात आहेत. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही. दोन्ही पक्षांच्या आघाडीबाबत अजून निर्णय का होत नाही ? उशीर का होतोय ?  या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आघाडी पक्की आहे. मी आणि राहुल गांधी यांच्यात याबाबत तीन बैठका झाल्या आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आघाडीबाबत राज्यातील दोन्ही पक्षाच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील आघाडीबाबत निर्णय घेण्यास उशीर होत असल्याचं वक्तव्य निराधार असल्याचंही पवार यांनी स्पष्ट केलं.

दोन्ही पक्षातील जागावाटपाबाबत लवकरच निर्णय होईल. त्यासाठी बैठकांचं सत्र आठवडाभरात सुरू होईल असंही पवार यांनी सांगितलं. द हिंदू या इंग्रजी वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे. या आघाडीमध्ये शेकाप, डावे पक्ष, आरपीआय यासह काही लहान पक्षांना सामावून घेण्याचा प्रय़त्न असल्याचंही पवार म्हणाले. तसंच निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

COMMENTS