संसदेचे हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबरपासून  – सूत्र

संसदेचे हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबरपासून – सूत्र

नवी दिल्ली – संसदेचे हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत होणार असल्याची माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे मोदी सरकार हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकत आहे, असा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षांनी केला होता. मंत्र्यांचे घोटाळे, राफेल खरेदी व्यवहार, जीएसटी आणि नोटाबंदी या प्रश्नांना सरकाराला सामोरे जावे लागणार असल्यानेच मोदी सरकार हिवाळी अधिवेशन पुढे ढकलत आहे, असाही आरोप काँग्रेसने केला होता.

‘विरोधकांना सामोरे जाण्याचे धाडस केंद्र सरकारकडे नाही. त्यामुळेच विविध कारणे देऊन पंतप्रधान मोदींकडून संसदेचे अधिवेशन सुरु करण्यात चालढकल केली जात आहे,’ असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या होत्या.  सरकार हिवाळी अधिवेशन सुरु करण्यात टाळाटाळ का करत आहे, असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केला होता.

COMMENTS