पंकजा मुंडेंमुळे दुष्काळग्रस्त शेतक-यांची दिवाळी गोड, बीडमधील वंचित शेतक-यांना मिळाला पीक विमा !

पंकजा मुंडेंमुळे दुष्काळग्रस्त शेतक-यांची दिवाळी गोड, बीडमधील वंचित शेतक-यांना मिळाला पीक विमा !

बीड – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे खरीप पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या जिल्हयातील साडे नऊ हजार शेतक-यांना विमा कंपनीने ६ कोटी ८९ लाख रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेला वर्ग केले आहेत. दरम्यान, ऐन दिवाळीत विम्याची रक्कम हाती आल्याने दुष्काळग्रस्त शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची दिवाळी गोड होणार आहे.

खरीप हंगाम २०१७ साठी जिल्हयातील शेतक-यांना यापूर्वी २६३ कोटी रूपये पीक विमा मिळाला होता. परंतू, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काही शाखांमधील लाभार्थी शेतकरी पात्र असूनही विमा कंपनीच्या चुकीमुळे विम्याची रक्कम मिळण्यापासून वंचित राहिले होते, त्यांची संख्या ९ हजार ५०९ इतकी होती. वंचित शेतक-यांनी ही बाब पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या कानावर घालताच त्यांनी तातडीने शासकीय स्तरावरून सुत्रे हलवली. यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी आठ दिवसांपूर्वी दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला लेखी पत्र पाठवून त्यांची चुक त्यांच्या निदर्शनास आणून दिली व शेतक-यांना सदर रक्कम तातडीने देण्याची सूचना केली. विमा कंपनीने काल या सर्व ९५०९ शेतक-यांची ६ कोटी ८९ लाख ५८ हजार २६१ इतकी विम्याची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेला वर्ग केली. शाखानिहाय मिळालेली विम्याची रक्कम पुढीलप्रमाणे- (कंसात लाभार्थी) परळी – ४ कोटी २५ लाख ८ हजार ८२ (३४५५), तलवाडा- १ कोटी २८ लाख ८७ हजार १२९ (२१३२), गढी- ६३ लाख १९ हजार ६७४ (२१११), गेवराई- ७२ लाख ४१ हजार ४२४ (१७९६), रूई नालकोल- १ हजार ९५२ (१५)

दुष्काळग्रस्त शेतक-यांना दिलासा

 अत्यल्प पाऊस व नापिकीमुळे जिल्हयातील शेतकरी अगोदरच दुष्काळाचा सामना करत आहे, त्यातच पात्र असूनही विमा न मिळाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत होता. अशा परिस्थितीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या संकटाला धावून गेल्या आणि विम्याची  रक्कम त्यांना मिळवून दिली. ऐन दिवाळीच्या तोंडावर विमा मिळाल्याने शेतकरी व त्यांच्या कुटूंबियांना मोठा दिलासा मिळाला असून शेतक-यांनी याबद्दल पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.

COMMENTS