पंकजा मुंडेंनी दिला बीड जिल्हयातील शाळा दुरूस्तीसाठी २५ कोटीचा निधी !

पंकजा मुंडेंनी दिला बीड जिल्हयातील शाळा दुरूस्तीसाठी २५ कोटीचा निधी !

बीड – जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारी शैक्षणिक अडचण लक्षात घेऊन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास विभागाच्या मूलभूत विकास योजनेतून (२५१५) जिल्हयातील एक हजार ९२७ शाळा खोल्यांच्या दुरूस्तीसाठी २५ कोटी २० लाख रुपये इतका निधी मंजूर केला आहे. या निधीतून अकराही तालुक्यांतील शाळांची दुरूस्ती होणार असून त्यांना नवं रूप मिळणार आहे.

जिल्हयातील अकरा तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या सुमारे २ हजार ५३७ शाळा असून बहुतांश ठिकाणी शाळा खोल्यांची दुरावस्था झाल्यामुळे शिक्षक व  विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शाळा खोल्यांची  दुरूस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभागाकडे पाठवला होता, या विभागाच्या मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी लगेचच हा प्रस्ताव मंजूर करून २५१५ मधून यासाठी २५ कोटी २० लाख ४० हजार रूपये इतका निधी उपलब्ध करून दिला आणि तसे आदेशही जिल्हा परिषदेला निर्गमित केले आहेत. दुरूस्तीनंतर सर्व शाळांची रंगरंगोटी  एक सारखी असावी आणि २६ जानेवारी पर्यंत त्याचे काम पुर्ण करावे अशा सूचना पंकजा मुंडे यांनी दिल्या आहेत.

शाळा दुरूस्तीसाठी असा मिळाला निधी

जिल्हा परिषदेच्या अकराही तालुक्यांत असणा-या एक हजार ९२७ शाळा खोल्यांना दुरूस्तीसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून संबंधित शाळांच्या गरजेनुसार खोल्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. मंजूर झालेला तालुकानिहाय निधी पुढीलप्रमाणे, कंसातील आकडे दुरूस्ती होणा-या शाळा खोल्यांची आहेत. बीड – ४ कोटी २० लाख ९९ हजार (४०८), परळी – ९ कोटी ५२ लाख ४२ हजार (३२४), अंबाजोगाई – ३ कोटी २८ लाख ५८ हजार (२०३), गेवराई – ९१ लाख ९२ हजार (१००), पाटोदा – १ कोटी २५ लाख ५७ हजार (१४३), शिरूर -६८ लाख ९० हजार (९२), वडवणी- २७ लाख ४० हजार (३४), केज- १ कोटी ५९ लाख ९७ हजार (२७४), माजलगांव – ९२ लाख ८० हजार (९९), आष्टी – ८१ लाख ९५ हजार (१११), धारूर – १ कोटी ६९ लाख ९० हजार (१३९)

COMMENTS