पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांवर नाराज ?

पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांवर नाराज ?

मुंबई – अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायदा लागू करण्यास स्थगिती देण्यावरून राज्य मंत्रिमंडळातच संघर्ष पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. स्थगितीचा हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परस्पर जाहीर केल्यानं महिला व बालविकास खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंगणवाडी सेविकांना मेस्मा लागू करण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी परस्पर घेतला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्याचबरोबर मंत्रीमंडळासमोरही हा विषय आणला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्रीही याबाबत पंकजा मुंडेवर नाराज असल्याची चर्चा आहे.

दरम्यान मागील तीन दिवस विधानसभेत मेस्माचा विषय़ उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी अंगणवाडी सेविकांना हा कायदा लागू राहिल अशी ठाम भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतली होती. बुधवारी शिवसेनेसह विरोधी पक्षांनी हा कायदा रद्द करावा अशी मागणी करत विधानसभा आणि विधानपरिषद गोंधळ घातला होता. तेव्हाही या मुद्यावर पंकजा मुंडे ठाम होत्या. मात्र आज गुरुवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी अचानक मेस्मा कायद्याला स्थगिती देण्याची घोषणा विधानसभेत केली. यावेळी पंकजा मुंडे विधानसभेत उपस्थित नव्हत्या.

त्यामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. अंगणवाडी सेविकांना मेस्मा लागू करण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी परस्पर घेतला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्याचबरोबर मंत्रीमंडळासमोरही हा विषय आणला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्रीही याबाबत पंकजा मुंडेवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मेस्मावरुन आता राज्यमंत्रिमंडळात संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.

 

COMMENTS