मंत्रालयाबाहेर शेतक-यांनी फेकला भाजीपाला, पोलिसांनी शेतक-यांना घेतलं ताब्यात !

मंत्रालयाबाहेर शेतक-यांनी फेकला भाजीपाला, पोलिसांनी शेतक-यांना घेतलं ताब्यात !

मुंबई – मंत्रालयाबाहेर भाजीपाला फेकणाऱ्या उस्मानाबादमधील शेतक-यांना मरीन लाईन्स पोलिसांनी अटक केली आहे. भाजीपाल्याचे दर घसरल्यामुळे या शेतक-यांनी आक्रमकत पवित्रा घेतला असून शेतात पिकवलेला भाजीपाला या शेतक-यांनी मंत्रालयाबाहेर फेकला आहे. लाखो रुपये खर्च करुन शेतातील भाजीपाला कवडीमोल भावाने विकला जात आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी संतापले आहे. याच संताची लाट मंत्रालयापर्यंत पोहचली असून या शेतक-यांनी आपला भाजीपाला मंत्रालयासमोर फेकला आहे.

दरम्यान आंदोलन केलेल्या या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धाव घेतली आहे. अटक केलेल्या शेतक-यांना सोडवण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना पोलीस ठाण्यात पाठवण्यात आलं आहे. दरम्यान शेतक-यांना सोडवण्यासाठी संदीप देशपांडे हे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

COMMENTS