सुपरस्टार रजनीकांत याचं मोदींच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या मोहिमेला समर्थन!

सुपरस्टार रजनीकांत याचं मोदींच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या मोहिमेला समर्थन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ अशी संकल्पना पुढे आणली होती, आता या मोहिमेला सुपरस्टार रजनीकांत याचा पाठींबा मिळाला आहे. याच वर्षी सक्रीय राजकारणात प्रवेश केलेल्या रजनीकांतने मोदींच्या या मोहिमेच समर्थन केल आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या अनोख्या मोहिमेमुळे पैसा आणि वेळ अशा दोन्ही गोष्टींची बचत होईल  अस म्हणत रजनीकांत यांनी या  मोहिमे बद्दलच आपल मत व्यक्त केल.

एका कार्यक्रमाला संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केल आहे. देशाला ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ची गरज आहे,  ही संकल्पना अतिशय वेगळी असून, त्यामुळे पैसा आणि वेळेची पूर्णपणे बचत होईल तेव्हा सर्वच पक्षांनी या मोहिमेत सहभागी होत एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

COMMENTS