मंत्रालयाच्या गेटवर आणखी एका शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न !

मंत्रालयाच्या गेटवर आणखी एका शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न !

मुंबई – मंत्रालयाच्या गेटवर आणखी एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. गुलाब मारुती शिंगारे असं या व्यक्तीचं नाव असून अंगावर रॉकेल ओतून त्यांनी आत्महदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. ५६ वर्षीय गुलाब शिंगारे हे बीड जिल्ह्यातील माजलगावचे रहिवासी असून त्यांना वेळीच मंत्रालय सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. गुलाब शिंगारे शेतकरी असून त्यांची जमिनीसंदर्भात तक्रा असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान मरिन ड्राईव्ह पोलिसांनी गुलाब शिंगारेंना ताब्यात घेतलं असून ते अधिक तपास करत आहेत.

COMMENTS