“नोटबंदीचा फायदा फक्त श्रीमंतांना झाला गरीबांना नाही”  

“नोटबंदीचा फायदा फक्त श्रीमंतांना झाला गरीबांना नाही”  

मुंबई –  ‘नोटबंदीचा फायदा फक्त श्रीमंतांना झाला आहे गरीबांना नाही.  कॅशलेस व्यवहाराचा फटका सामान्यांना बसत आहे. प्रत्येक व्यवहारावर कमीशन जात आहे.  नोटबंदी दिवस भाजप साजरा करत आहे. त्यांची कीव करावी वाटते. रांगेत मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याचा विसर भाजपला पडला आहे.’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. नोटबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.  नोटबंदीच्या वर्षपूर्तीच्या निषेधार्थ  महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनेक शहरांमध्ये निदर्शने करणार आहे.

या निमित्ताने अजित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे, ‘सहकार चळवळ मोडीत काढण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. जिल्हा बँकांकडे अजूनही कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटा पडून आहे. मी लाभार्थी जाहीरात फसवी आहे. बातम्या आल्यावर संबधीत शेतकर्याला सरकारने बोलावले. त्याला समजावले  आणि लाभार्थी असल्याचे सांगायला लावले.  कर्जमाफी योजनेत सावळा गोंधळ सुरू आहे. दिवाळीत पैसे मिळणार होते. अजून पैसे मिळालेले नाहीत. डिसेंबर अखेर पंर्यत पैसे मिळणार नाहीत असे दिसतेय. आयटी विभागाचा गोंधळ. सरकारचा दावा काही असला तरी, वीस लाख शेतकर्यांनाच कर्ज माफी मिळेल असे दिसतेय. असे पवार म्हणाले.

 

 

COMMENTS